Posts

नागपंचमी : आठवणींच्या पुरात भिजलेला एक सण 🐍✨

 🔴 नागपंचमी : आठवणींच्या पुरात भिजलेला एक सण 🐍✨ नागपंचमीच्या निमित्ताने आम्ही आमच्या किर्लोस गावी गेलो होतो. किर्लोसला आता आंबवणेवाडी म्हणूनही ओळखतात आणि आमचा हा आंबवणे गाव आता महसुली गाव झाला आहे. त्या दिवशी पाऊस अगदी बेसुमार कोसळत होता. वरवडे कासरलच्या बंधाऱ्यावरून पाणी उसळ्या मारत वाहत होते आणि क्षणाक्षणाला पाण्याचा वेग वाढतच चालला होता. 🌧️🌊 त्या उफाळणाऱ्या पुरापेक्षाही आमच्या मनात घरी पोहोचण्याची ओढ अधिक दाटून आली होती. कधी एकदा पावले घराचा उंबरठा ओलांडतात आणि कधी एकदा नागोबाच्या पाया पडतो, असे झाले होते. आपल्या माणसांच्या सहवासाची ओढच मुळी अशी असते, जी कोणत्याही संकटावर मात करते! आमचे गाव नदीच्या पलीकडे असल्याने काहीही झाले तरी नदी पार करून जाणे भागच होते. अखेर आम्ही गाडी सुरक्षित ठिकाणी अलीकडेच लावली आणि लांबलचक लोखंडी साकवावरून पायी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. 🚗🚶‍♂️ पावसाची अखंड झड झेलत, शेताच्या चिखलमय बांधांवरून तोल सांभाळत आमची पावले पडत होती. निसर्गाचे ते रौद्र रूप अंगावर काटा आणत होते. चालता चालता नदी कधी आली ते समजलेच नाही. पाण्याच्या केवळ १०-१५ फूट वर असलेल्या...

माझी आई : नित्य नूतन, टवटवीत आठवण...

Image
  माझी आई : नित्य नूतन, टवटवीत आठवण...           आई म्हणजे काळजाचा असा एक हळवा कोपरा, जिथे आठवणींची पालवी कधीच सुकत नाही; उलट प्रत्येक वाहणाऱ्या श्वासासोबत ती अधिकच ताजी आणि टवटवीत होत जाते. आज ती आम्हा भावंडांना सोडून देवाघरी जाऊन १७ वर्षे उलटून गेली. काळाच्या ओघात वर्षं झरझर मागे पडत गेली, पण तिचं असणं आजही घराच्या कानाकोपऱ्यात आणि आमच्या मनात अगदी काल-परवासारखंच जिवंत आहे.           आम्ही पाच भावंडे— ताई, आका, मी बाळू, न्हानू आणि पपी... आज तिच्याच पुण्याईने आणि आशीर्वादाने आपापल्या संसारात समाधानात आहोत, सुखात आहोत. पण हे सुख, हे स्थैर्य आणि यश अनुभवताना आजही प्रत्येक क्षणी डोळे नकळत तिलाच शोधतात. जिच्या कष्टांवर, त्यागावर आजचे हे समाधानाचे दिवस उभे राहिले, ती माऊली आज कौतुकाने पाहायला आमच्यासोबत हवी होती, ही रुखरुख काळजात कायमची घर करून राहिली आहे.           अथांग सहनशीलता हेच तिचं रूप होतं. आम्ही बालपणी कितीही खोड्या केल्या, तरी तिच्या मुखातून कधी मनाला टोचेल असा शब्द बाहेर पडला नाही. तिचा सहवास म्हण...